Ad will apear here
Next
‘आळेयुक्त झाडे’ उपक्रमाला सुरुवात
‘वनराई’ आणि ‘आंघोळीची गोळी’ यांची मोहीम
‘आळेयुक्त झाडे’ या उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी खा. वंदना चव्हाण, डॉ. सतीश देसाई, माधव पाटील, अंकुश काकडे, धीरज घाटे, श्याम मानकर, दिलीप सेठ, नितीन जाधव, दिलीप मेहता, अमित वाडेकर, धनंजय देशपांडे आणि ‘आंघोळीची गोळी’चे कार्येकर्ते.

पुणे : ‘झाडांचे सैनिक होऊ या, चला, झाडांना आळे करू या...’ अशी गर्जना करत, असंख्य निसर्गप्रेमी पुण्यात स्वातंत्र्यदिनानिमित्त एकवटले. ‘वनराई’ आणि ‘आंघोळीची गोळी’ यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या ‘आळेयुक्त झाडे’ या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. लोकमान्यनगर येथील जॉगर्स पार्कच्या प्रवेशद्वाराजवळील झाडांना आळे करून या उपक्रमाला सुरुवात झाली. 

या वेळी खा. वंदना चव्हाण, डॉ. सतीश देसाई, माधव पाटील, अंकुश काकडे, नगरसेवक धीरज घाटे, श्याम मानकर, दिलीप सेठ, नितीन जाधव, दिलीप मेहता, अमित वाडेकर, धनंजय देशपांडे, विद्यार्थी आणि ‘आंघोळीची गोळी’चे कार्येकर्ते उपस्थित होते. 

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत निसर्गसंवर्धनासाठी नव्या स्वातंत्र्य संग्रामाची सुरूवात झाली आहे. वाढत्या शहरीकरणामुळे शहरातील झाडांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. झाडाला लागूनच सिमेंट, डांबर, पेव्हिंग ब्लॉक लावून झाडांचे स्वातंत्र्य हिरावले जात आहे. झाडांच्या हक्काची जमीन आणि पाणी या साध्या मूलभूत गरजा त्याला मिळाव्यात, या उद्देशाने ‘वनराई’ आणि ‘आंघोळीची गोळी’ यांच्या वतीने हा अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. 

‘वनराई’चे अध्यक्ष रवींद्र धारिया म्हणाले, ‘राष्ट्रीय हरित लवाद’च्या २०१३ च्या आदेशानुसार प्रत्येक झाडाला एक मीटर व्यासाचे आळे पाहिजे. त्यामुळे झाडाला जगण्यासाठी पुरेसे पाणी आणि वाढण्यासाठी हक्काची जमीन मिळेल. त्याद्वारे नैसर्गिकरित्या जलपुनर्भरण होईल. शहरात झाडांचे गळे हे सिमेंट, डांबर आणि पेव्हिंग ब्लॉकने आवळलेले असतात. यामुळे झाडांच्या बुंध्याजवळ झिरपणारे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्याऐवजी वाहून जाते. त्यामुळे झाडे कमकुवत होऊन एक दिवस उन्मळून पडतात.’

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/IZPFBR
Similar Posts
सावरकर कुटुंबावर आधारित ‘त्या तिघी’ एकपात्री प्रयोगाला प्रतिसाद पुणे : स्वातंत्र्यसंग्रामातील सावरकर कुटुंबियांच्या घरातील बंधू त्रयीच्या पत्नींचे योगदान मांडणाऱ्या त्या तिघी' या डॉ. शुभा साठे लिखित कादंबरीवर आधारित ‘त्या तिघी...स्वातंत्र्यकुंडातील अज्ञात समिधा’ या एकपात्री प्रयोगाला पुणेकर रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
लायन्स क्लबच्या कॅच देम यंग उपक्रमात एक लाख विद्यार्थ्यांचा सहभाग पुणे : ‘लायन्स क्लब ऑफ पुणे इको फ्रेंड्स’ आणि ‘वनराई’ यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या ‘कॅच देम यंग’ उपक्रमात तीन वर्षांमध्ये १२० शाळांमधील एक लाख विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यानिमित्त पर्यावरण जागृतीसाठी उल्लेखनीय कामगिरी करण्याऱ्या शाळांचा गौरव करण्यात आला.  भेकराईमाता माध्यमिक
जवानांवरील हल्ल्याचा ‘पुण्यभूषण’कडून निषेध पुणे : काश्मीरमधील जवानांवरील दहशतवादी हल्ल्याचा पुण्यभूषण फाउंडेशनकडून निषेध करण्यात आला आहे. ‘हा हल्ला म्हणजे भारतीय लोकशाहीवरील हल्ला आहे. भारतीय सहनशीलतेची परीक्षा असून, आपण जशास तसे उत्तर देऊन जवानांच्या मृत्यूचा बदला घेतला पाहिजे’, अशी भावना ‘पुण्यभूषण’चे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी पत्रकाद्वारे व्यक्त केली आहे आहे
‘जलक्षेत्रातील अनागोंदी आणि हवामानातील बदल घातक’ पुणे : ‘पाणी चोरी, पाणी नाश, कालव्यांची दुरावस्था, व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष ही कालव्यांची परिस्थिती बिघडण्याची प्रमुख करणे आहेत. कायद्याची अंमलबजावणी, शिस्त आणि दरारा नसल्यामुळे कालव्यांची अवस्था खराब झाली आहे. जलक्षेत्रातील अनागोंदी आणि हवामानातील बदल यांची आघाडी ही राज्याला आगामी काळात घातक ठरणार आहे,’ असे मत जेष्ठ जलतज्ज्ञ प्रा

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language